महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी विधानसभेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या हाती येणार अपयशच - बावनकुळे - CM

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातून यश निघून गेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हाती अपयशच येणार, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना

By

Published : Sep 20, 2019, 7:11 AM IST

Updated : Sep 20, 2019, 9:19 AM IST

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातून यश निघून गेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हाती अपयशच येणार, असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटले आहे. वर्ध्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने यशाचा विचारही करू नये.जनता त्याच्यांपासून खूप दूर गेली आहे. त्यामुळे पराभवासाठी तयार रहा, असा जनतेने त्यांना संदेश दिला आहे. लोकसभा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत निवणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या हाती अपयशच येणार, असे राज्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे. या पाच वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची पीचेहाट झाली आहे. मतदारांंनी त्यांना नाकारले आहे. या अपयशाच कारण त्यांनी शोधलं पाहिजे.आपली पीछेहाट कशामुळे झाली याच आत्मचिंतन केले पाहिजे. पवार साहेब कितीही महाराष्ट्रात फिरले तरी त्यामुळे काही साध्य होणार हे मला माहीत नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी? देवरा अन् निरुपमांनी पक्षाच्या आंदोलनाकडे फिरवली पाठ

संजय राऊत युतीवर काय बोलले हे मला माहित नाही. युतीबाबत निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे, अमित शाह, मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना आहे.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटलांंनीआपली भूमिका स्पष्ट केली आहे.याबाबत त्यांचा निर्णय अंतिम आहे. उद्धव ठाकरे, अमित शाह, देेवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांमध्ये एकमत आहे.यावरून युती होईलच असे दिसत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Sep 20, 2019, 9:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details