देशाच्या आर्थिक परिस्थितीला लपविण्यासाठी जादूटोण्याचा विषय - नाना पटोले
मागील पाच वर्षात शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. कर्जमाफी झाली नाही. विम्याची नुकसानभरपाई अजून मिळाली नाही. खासगी कंपन्या नफेखोरी करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
नाना पटोले
वर्धा- आपले राज्य शाहू, फुलेंचे आहे. प्रज्ञा सिंग सांगते जादूटोण्यामुळे लोक मरतात. करकरेंबद्दल प्रज्ञा सिंग बोलतात की शाप दिला. पण, खरेतर त्यांचे नेते अमित शाह, मोदींच्या धाकाने मरतात. देशाची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली आहे. या विषयाला बाजूला करण्यासाठी हा जादूटोण्याचा विषय आला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे म्हणत हे षडयंत्र असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
मागील पाच वर्षात शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, कर्जमाफी झाली नाही. विम्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. खासगी कंपन्या नफेखोरी करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. भाजपचे विचार अंधश्रध्दचे आहेत, अशीही टीका त्यांनी केली. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, खरे म्हणजे प्रज्ञा सिंग हे मालेगावच्या बॉम्बस्पोटातील आरोपी होत्या. त्या सध्या खासदार झाल्या आहे. भाजपने त्यांना तिकीट दिले त्या खासदार झाल्या. अंधश्रद्धेचे विचार भाजपचे आहेत, खरे म्हणजे असा कोणी जादू-टोणा करत नसतो, असेही ते म्हणाले.