महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर विभागीय आयुक्तांनी ग्रीनझोनमधील कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा - विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार

नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी वर्ध्यातील कोरोना उपाययोजनेसाठी केलेल्या तयारीची पाहणी केली. कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आणि सावंगी रुग्णालयची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठकही आयुक्तांनी घेतली.

Nagpur Divisional Commissioner
नागपूर विभागीय आयुक्त

By

Published : Apr 24, 2020, 7:48 AM IST

वर्धा -नागपूर विभागात नागपूर वगळता सर्व जिल्हे सध्या कोरोना ग्रीन झोनमध्ये आहेत. विभागात पुढील काळात कोरोनाचा रुग्ण सापडू नये यासाठीच्या तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. वर्ध्यातील कोरोना उपाययोजनेसाठी केलेल्या तयारीची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयुक्तांनी घेतली.

यामध्ये कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर आणि सावंगी रुग्णालयची पाहणी त्यांनी केली. सेवाग्राम येथे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्याशीही चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. विलगीकरण कक्ष, व्हेंटिलेटर वार्ड, प्रयोगशाळा यांची पाहणी केली. सेवाग्राम रुग्णालयाने केलेल्या तयारीबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

सावंगी येथील रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुमारे 800 बेडच्या विलगीकरण कक्षाची, टेस्टिंग प्रयोगशाळा यांची पाहणी करून अधिक्षकांशी चर्चा केली. आय टी आय टेकडीवर गरज पडल्यास नियोजन करण्यात आलेल्या 4 कोविड सेंटरचीसुद्धा आयुक्तांनी पाहणी केली. न्यू इंग्लिश शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या परराज्यातील मजुरांशी त्यांनी संवाद साधला. त्यांना काम देण्यात येईल मात्र, जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत त्यांना येथेच थांबावे लागेल, याबाबत आयु्क्तांनी त्यांचे समुपदेशन केले. सामाजिक संस्थेकडून उभारलेल्या भाजी बाजाराची सुद्धा आयुक्त संजीवकुमार यांनी पाहणी केली.

त्यानंतर विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी जिल्ह्यातील धान्य वाटप, लॉकडाऊन काळात केलेल्या कारवाया, दाखल झालेले गुन्हे आणि सुरू झालेल्या कामांची माहिती जाणून घेतली. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी, सुरेश बगळे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details