महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुथुट फायनान्स'मध्ये दरोडा.. वर्ध्यातील बँक व्यवस्थापनाला गुंगारा

बंदूक आणि चाकू दाखवत दिवसाढळ्या मुथुट फायनान्सच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये तीन लाख अठरा हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह साडे तीन किलो सोने चोरट्यांनी लंपास केलंय.

muthoot finance robbed in wardha
'मुथुट फायनान्स'मध्ये दरोडा.. वर्ध्यातील बँक व्यवस्थापनाला गुंगारा

By

Published : Dec 17, 2020, 12:40 PM IST

Updated : Dec 18, 2020, 9:41 AM IST

वर्धा - बंदूक आणि चाकू दाखवत दिवसाढळ्या मुथुट फायनान्सच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये तीन लाख अठरा हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह साडे तीन किलो सोने चोरट्यांनी लंपास केलंय. दरेडेखोराने बँक लुटल्यावर कर्मचाऱ्यांच्या दुचाकीनेच धूम ठोकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

'मुथुट फायनान्स'मध्ये दरोडा.. वर्ध्यातील बँक व्यवस्थापनाला गुंगारा

मुथुट फायनान्सच्या बँक व्यवस्थापनाला गुंगारा देत चोरट्यांनी डाव साधला. व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून हा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर फिंगर प्रिंट आणि चोरट्यांचे स्केच काढण्याचे काम सुरू झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Last Updated : Dec 18, 2020, 9:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details