वर्धा- झारखंड येथील मॉब लिचिंग प्रकरणात तबरेज अंसारी या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी वर्ध्यातील मुस्लीम संघटनांनी एकत्रित येत मुस्लीम एकता मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
झारखंडच्या मॉब लिचिंग घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात मोर्चा - तबरेज अंसारी
झारखंड येथील मॉब लिचिंग प्रकरणात तबरेज अंसारी या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी वर्ध्यातील मुस्लीम संघटनांनी एकत्रित येत मुस्लीम एकता मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चाची सुरवात नमाज करून करण्यात आली. शहरातील इतवारा मार्गे निघत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना मागणीचे निवेदन दिले. तसेच युवकांनी हातात पोस्टर घेत न्याय देण्याची मागणी केली.
देशात जमावाकाढून मारहाण झाल्याने मृत्यू होत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे मॉब लिचिंग कायदा बनविण्यात यावा. या माध्यमातून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तबरेज अंसारी प्रकणातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. तसेच तबरेजच्या पत्नीला सरकारी नौकरीत समावेश करून घेत कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.