वर्धा - येथील पुलंगावात शुक्रवारी रात्री तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. शहराच्या तेलंघाणी परिसरात ही घटना घडली आहे. जयकुमार वाणी असे मृताचे नाव आहे. बहिणीचे तरुणावर असलेल्या प्रेमप्रकरणातून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार करत हत्या केली. घटनेनंतर आरोपींनी पळ काढला. पुलंगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर 24 तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
वर्ध्यात भावने केली बहिणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या - भावने केली बहणीच्या प्रियकराची तलवारीने हत्या
पुलंगावात शुक्रवारी रात्री तरुणाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. शहराच्या तेलंघाणी परिसरात ही घटना घडली आहे. जयकुमार वाणी असे मृताचे नाव आहे. बहिणीचे तरुणावर असलेल्या प्रेमप्रकरणातून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार करत ही हत्या केली.
जयकुमार वाणी हा पुलंगावच्या भीमनगर परिसरात राहत होता. जयकुमारचा डीजेचा व्यवसाय होता. शुक्रवारी जयकुमार तेलघाणी फैलातून पायी जात असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून येत दोघांनी तलवारीने वार केले. हा हल्ला इतका जोरदार होता, की त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले.
शहरात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. यात आशिष लोणकर आणि अक्षय माहुरे यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले. अक्षयची बहीण प्रेम प्रकरणातून विवाह करणार असल्याची माहिती मिळाली होती. याचाच राग मनात घेऊन हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासचक्रे फिरवली. अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे तीन पथके रवाना करत आरोपीचा शोध घेत अटक केली.