महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हे अपयशी, विदर्भावर अन्याय करणारे सरकार - खासदार रामदास तडस - खासदार रामदास तडस महाविकास आघाडी सरकार

आघाडी सरकारने विदर्भावर सातत्याने अन्याय केला. विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले. पण, सरकारने तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली. हे सरकार केवळ बदल्या करण्यात खुश असल्याचेही खासदार तडस यांनी सांगत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यकाळावर टीका केली.

खासदार रामदास तडस
खासदार रामदास तडस

By

Published : Nov 27, 2020, 10:03 PM IST

वर्धा - शिवसेनेने युतीद्वारे निवडणूक लढवली आणि सत्तेसाठी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. या आघाडी सरकारने विदर्भावर सातत्याने अन्याय केला. विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले. पण, सरकारने तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली. हे सरकार केवळ बदल्या करण्यात खुश असल्याचेही खासदार रामदास तडस यांनी सांगत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यकाळावर टीका केली.

खासदार रामदास तडस
शेतकरी यंदा मेटाकुटीला आला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला. सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. यंदाच्या हंगामात अतिवृष्टी आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. पण, नुकसान भरपाई देताना पूर्व विदभाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. केवळ 17 कोटी दिले. यात वर्धा जिल्ह्याला केवळ 58 लाखांची मदत मिळाली आहे.
पूर्व विदर्भातील कोणत्या जिल्ह्याला किती?


यात नागपूर जिल्ह्याला 65 लाखाची मदत, वर्धेला 58 लाख, भंडाऱ्याला 10 कोटी, गोंदियाला 2 कोटी, चंद्रपूरला 62 लाख तर गडचिरोली 2 कोटी, अशी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना 17 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तेच वर्धा जिल्ह्यात जवळपास 80 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तेच कपाशिचेही नुकसान 50 टक्याच्या घरात असून नुकसान दिवसागणीक वाढत चालले आहे.


या सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना हात आखूड केला आहे. तेच बदल्या करण्यात मात्र कठोर भूमिका घेतली आहे. बदल्यांचा सपाटा लावण्याचे काम केल्याने हे बदल्यांचे सरकार असल्याचाही आरोप खासदार रामदास तडस यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. वीज बिलाच्या माफीवरही सरकारने शब्द बदलवत सामान्य नागरिकांवर अन्याय केला असल्याचेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details