महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तरप्रदेशातील आदिवासी हत्याकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन - congress

उत्तर प्रदेशातील आदिवासींच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या अटकेचाही निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले असून वर्ध्यासोबतच हिंगणघाट येथेही काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

वर्ध्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By

Published : Jul 21, 2019, 8:28 AM IST

वर्धा - उत्तरप्रदेशात आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी ताबा करणाऱ्यांचा विरोध केल्यामुळे आदिवासी समुदायावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला. या पिडीत आदिवासी कुटुंबीयांच्या सांत्वनाकरीता काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी जात होत्या. त्यांना गावात जाऊ न देता, पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन देण्यात आले आहे.

वर्ध्यात काँग्रेसचे धरणे आंदोलन
देशभरात उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसोबत जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडचा विरोध करण्यात येत आहे. या पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वडेरा यांना मधातच रोखण्यात आले. पोलिसांनी त्यांना गावात जाण्यासाठी मज्जाव करत, अटक केले. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळाले. पिडीत कुटुंबाला भेटण्यापासून रोखल्याने उत्तर प्रदेशमध्ये हुकुमशाही पद्धतीने काम केले जात असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. या आदिवासीयांच्या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आली. तसेच महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या प्रकाराचा निषेध करीत योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी याठिकाणी करण्यात आली.

यानंतर घटनेच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. हिंगणघाट, समुद्रपूर येथेही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला असून, यावेळी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष सुधीर पांगुळ, महिला काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे, वर्धा तालुका अध्यक्ष धैर्यशील जगताप, धर्मपाल ताकसांडे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष पठाण, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. मिलिंद ठोंबरे , माजी सैनिक प्रवीण पेठे, पंचायत समिती सदस्य राजेश राजूरकर, देवळी पंचायत समितीचे सदस्य अशोक इंगळे, डॉ. बाळा माऊस्कर, ज्येष्ठ नेते बाबा अब्दुल जलिल, मनिष गंगमवार, प्रशांत देशमुख, एनएसयुआयचे समन्वयक गोविंद दिघीकर, प्रशांत झाडे, मिलिंद मोहोड, सतिश लांबट आदी सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details