महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाच दुचाकीसह अल्पवयीन चोरट्याला अटक, हिंगणघाट पोलिसांची कारवाई - डीबी पथक

वर्ध्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका अल्पवयीन मुलाकडून पाच दुचाकी जप्त केल्या. शहरात फिरत असताना हा अल्पवयीन चोरटा दुचाकी घेऊन पसार व्हायचा. शहरातील मागील तीन महिन्यात विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या या दुचाकी मिळवण्यात अखेर हिंगणघाट पोलिसाना यश आले आहे.

अल्पवयीन चोरट्याला अटक

By

Published : Jul 1, 2019, 9:57 PM IST

वर्धा - शहरात फिरून हाताला लागलेल्या दुचाकी घेऊन पसार होणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला पकडण्यात वर्ध्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे. या चोरट्याने मागील तीन महिन्यात शहरातील विविध ठिकाणांवरून पाच दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी या पाच दुचाक्या जप्त केल्या आहेत.

चोराकडून जप्त केलेल्या पाच दुचाकीसह हिंगणघाट पोलीस ठाण्याचे डीबी पथक


अगोदरच गुन्हे दाखल असलेला एक अल्पवयीन मुलगा हा पल्सर बाईक घेऊन शहरात फिरत होता. डीबी पथकाच्या चमूने या संशयित मुलाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, असमाधानकारक उत्तर मिळाले. अखेर माता मंदिर परिसरातून ही दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिली. यानंतर शहरातून इतर चार दुचाकी चोरल्याचेही सांगितले. शहरात मागील तीन महिन्यात विविध ठिकाणावरून चोरी झालेल्या दुचाकी मिळवण्यात अखेर हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे.


डीबी पथकाने सदर पाचही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. तीन महिन्यात चोरी झालेल्या या पाचही दुचाकींच्या गुन्ह्याची पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पाचही दुचाकीची किंमत मुद्देमाल दीड लाखाचा घरात असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच या दुचाकी त्याचा मूळ मालकांना परत मिळणार असल्याने, शहरवासियांकडून आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले जात आहे.


ही कारवाई एसडीपीओ भिमराव टेळे, पोलीस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात डिबी पथकाचे दिवाकर परीमल सुनील पाऊलझाडे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे,सचिन भारशंकर यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details