वर्धा -जिह्ल्यातील समुद्रपूर तालुक्यात तीन दिवसांच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोघींचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रसिका कैलास नारनवरे अस मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तीन दिवसाच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू, उष्माघात झाल्याचा संशय - Heat stroke
जिह्ल्यातील समुद्रपूर तालुक्यात तीन दिवसांच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रसिका कैलास नारनवरे अस मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांनी दिली.
तापमानाचा पारा उच्चांक गाठत असून तापमान 47 अंशावर जाऊन पोहचले आहे. रसिकाला २२ मे रोजी प्रसूतीसाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २३ मे रोजी तिने चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर रसिका बाळासोबत घरी पोहोचली असता बाळाची प्रकृती अचानक बिघडली. चिमुकलीला लागलीच हिंगणघाट येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता बाळाचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी रसिकाची प्रकृती ढासळली. तीव्र तापाने ती अस्वस्थ होऊ लागली. घरच्यांनी तिला लगेच गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान रसीकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांनी दिली.