महाराष्ट्र

maharashtra

बापू आणि बाबावर असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे - मुरारी बापू

By

Published : Nov 17, 2019, 7:54 AM IST

गांधी आणि विनोबा सत्य असून ते सर्वांचे आहेत, अशी भावना राम कथाकार मुरारी बापू यांनी व्यक्त केली. विनोबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात मुरारी बापू यांनी मार्गदर्शन केले.

मुरारी बापू

वर्धा - पूज्य बापू (महात्मा गांधी) आणि आणि बाबा (विनोबा भावे) यांच्या प्रति असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे आहे. गांधी आणि विनोबा सत्य असून ते सर्वांचे आहेत, अशी भावना राम कथाकार मुरारी बापू यांनी व्यक्त केली. वर्ध्यातील पवनार येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

बापू आणि बाबावर असलेले प्रेम प्रसिद्धीसाठी नाही तर आपुलकीचे


विनोबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित मैत्री मिलन सोहळ्यात मुरारी बापू यांनी मार्गदर्शन केले. विनोबा आणि महात्मा गांधींनी आयुष्य जगताना तीन महत्त्वाचे धडे दिले आहेत. त्यांनी लोकांसाठी आयुष्यभर पदयात्रा केली. भूदान चळवळ घेऊन ते माझ्या गावापर्यंत पोहचले होते. महात्मा गांधींना आपण साबरमतीचे संत म्हणतो त्याचप्रमाणे मला विनोबा देखील वामन फकीर वाटतात, असे विचार मुरारी बापूंनी मांडले.

हेही वाचा - केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; कारण अस्पष्ट


आपण विचार आणि आचाराचे शेंदूर लावावेत. बापू आणि बाबांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे, त्यातून समाजाचे कल्याण होण्यास मदत होईल, असेही मुरारी बापूंनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details