महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्यावतीने पंतप्रधान सहाय्यता निधीस 19 लाखांची मदत - कोरोनाकाळात मदत वर्धा बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीस दान करण्याचा निश्चय केला. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष पी.एल. तापडिया यांनी 19 लाख 20 हजार 648 रुपयाचा धनादेश प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपुर्द केला आहे.

प्रधानमंत्री सहायता निधीस 19 लाखाची मदत
प्रधानमंत्री सहायता निधीस 19 लाखाची मदत

By

Published : Jun 5, 2020, 9:22 PM IST

वर्धा - सध्या कोरोनामुळे मोठं संकट उभे ठाकले आहे. या काळात पंतप्रधान सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन करण्यात आले. याच आवाहनाला वर्ध्याच्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करत एक दिवसाचे वेतन देऊ केले. या माध्यमातून 1 हजार 77 कर्मचाऱ्यांनी 19 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याकडे सोपवला आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये मदतीच्या आवाहनानुसार कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीस दान करण्याचा निश्चय केला. त्यानुसार कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष पी.एल. तापडिया यांनी 19 लाख 20 हजार 648 रुपयाचा धनादेश प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपुर्द केला आहे.

कोरोनाच्या महामारी संपूर्ण देशाला आपल्या विळख्यात ओढले आहे. अशा संकटकाळी देशाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी मदत करण्याचे ठरविले. या मदतीसाठी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान, कस्तुरबा हॉस्पीटल, कस्तुरबा नर्सिंग स्कूल आणि कस्तुरबा कॉलेजच्या 1 हजार 77 कर्मचाऱ्यांनी एक दिवासचे वेतन जमा केले. या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी भीमनवार यांना सोपवल्याची माहिती यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे पी.एल. तापडिया यांनी दिली. यावेळी सचिव डॉ. बी.एस.गर्ग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. एन.एम. गगणे यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details