महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशोक शिंदेना मनसेचा जाहीर पाठिंबा - Ashok Shinde hinganghat latest news

युतीत जागा न मिळाल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. शिंदेना मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने हिंगणघाट मतदारसंघातील राजकीय आखाड्यात वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे. बंडखोरीतून तयार झालेली ही युती मात्र राजकीय दृष्ट्या निवडणुकीत रंगत वाढवणारी ठरणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशोक शिंदेना मनसेचा जाहीर पाठिंबा

By

Published : Oct 15, 2019, 12:00 AM IST

वर्धा -भाजपसाठी सोपी समजली जाणारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मतदानाची वेळ जवळ येता-येता कठीण होत चालली आहे. युतीत जागा न मिळाल्याने बंडखोरी करत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. मनसेकडून जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांचे अर्ज छाननीत नामांकन रद्द झाले होते. आज पत्रकार परिषद घेऊन शिंदेना मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने हिंगणघाट मतदारसंघातील राजकीय आखाड्यात वेगळी रंगत पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अशोक शिंदेना मनसेचा जाहीर पाठिंबा

हेही वाचा -मोठ्या लोकांवर असलेले 81 हजार कोटींचे कर्ज सरकार भरणार - शरद पवार

पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिल्याचे अतुल वांदिले यांनी सांगितले आहे. बंडखोरीतून तयार झालेली ही युती मात्र राजकीय दृष्ट्या निवडणुकीत रंगत वाढवणारी ठरणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणे जोडली जात आहेत. यात मनसेच्या पाठिंब्याने अशोक शिंदे यांची बाजू भक्कम झाली आहे. याचा फायदा त्यांना होईल आणि राजकीय रणनितीतून निवडणूक जिंकण्याचे ध्येय साध्य करणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मात्र, मतदार हा बदल स्वीकारतील की नाही हे मतांच्या आकडेवारीतुनच समोर येईल. दरम्यान, राष्ट्रवादीतील नाराज झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी कुणाला पाठिंबा जाहीर करणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details