महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुग्धविकास मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व, तरीही दूध खरेदीला टाळाटाळ, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान - दुग्धविकास मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व

दुग्धविकास मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकत्व असूनही तरीही दूध खरेदीला टाळाटाळ केली जात असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुरू आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दूध संघाच्या कार्यालयाला दिली. प्रोटीन कमी असल्याचे कारण पुढे करत खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. 7 हजार लिटर दुधाची आवक असूनही 700 लिटर दूध नाकारले जात असल्याने मोठा फटका ल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Milk purchasing stop
दुध खरेदीला टाळाटाळ

By

Published : Apr 11, 2020, 10:46 PM IST

वर्धा- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून दूध प्रोटिनयुक्त नसल्याचे कारण सांगत दूध परत केले जात आहे. सेलू तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्याचे पालकत्व खुद्द दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे आहे. त्याच जिल्ह्यात हा प्रकार घडत आहे. यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हा सहकारी दूध उत्पादक दूध उत्पादक संघाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी (11 फेब्रुवारीला) भेट घेऊन चर्चा केली. यात दूध घेताना जाचक अटी न लावता दूध घेण्याच्या सूचना दिल्या आहे.

दुध खरेदीला टाळाटाळ

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली. याशिवाय हॉटेल चहाटपरी बंद असल्याने दुधाचा साठा वाढला. यामुळे शेतकऱ्यांचा घरात एकही थेंब दूध शिल्लक राहू देणार नाही असे पालकमंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले. पण दुग्धविकास मंत्र्यांचा आदेशाला त्याचे पालकत्व असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात हरताळ फासला जात आहे. हा प्रकार आज सेलूच्या दूध उत्पादकासोबत घडला आहे. यावर सहकारी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कार्यलायत जाऊन आमदार भोयर यांनी प्रकार समजून घेतला. यावर दूध परत करण्याचे कारणे सांगताना विदर्भातील आणि वर्ध्याच्या दुधात प्रोटीन कमी असल्याचे सांगण्यात आले.

7 हजार लिटर दूध संघ दूध खरेदी करत आहे. यात 700 लिटर दूध प्रोटीन कमी असल्याने नाकारले जात असल्याचे सांगण्यात आले. यामुळे एकीकडे आदेश असताना दुसरीकडे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे घरातील दुधाला जाचक अटी लावून परत न करता शासनाच्या आदेशाचे प्रमाणे दूध खरेदी करा. यासह तोडगा काढा अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दूध उत्पादक संघाचे बीडीओ नवले यांना चर्चेत दिल्यात. यामुळे पुढील काळात दूध घेणार की जाचक अटी लावून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणार हे पाहावे लागतील.यासह दुग्ध विकास मंत्र्यांचे आदेश पालकत्व असनाऱ्या जिल्ह्यात पायदळी न तुडवता पालन केल्यास शेतकऱ्यांना दूध उत्पादकान ही मदत मोलाची ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details