वर्धा- हिंगणघाट शहरातून मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गावाकडे जाणाऱ्या 57 परप्रांतीय कामगारांना थांबवण्यात आले. ही कारवाई हिंगणघाट पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली. कारवाईनंतर पोलिसांनी माणुसकी दाखवत तात्काळ त्यांच्यासाठी चहा, पाणी आणि नाश्त्याची सोय केली.
परप्रांतात निघालेल्या 57 जणांना पोलिसांनी अडवले, वाहनचालकांवर कारवाई - migrant labourers trying to reach at there hometown
कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल आहे. परप्रांतात जाणाऱ्या 57 मजुरांना थांबविण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे. या सर्व कामगारांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली गेली आहे.
![परप्रांतात निघालेल्या 57 जणांना पोलिसांनी अडवले, वाहनचालकांवर कारवाई वाहनचालकांवर कारवाई](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6603276-456-6603276-1585622712569.jpg)
या सर्वांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. हिंगणघाट शहरतील उपजिल्हा रुग्णालय परिसरातून आणि नांदगाव चौकातून हे ट्रक जात असताना पोलिसांनी अडवले आहेत. यातील एक ट्रक हा चेन्नई ते ग्वालीयर असे 1 हजार 833 किलोमीटरचे अंतर कापून जात होता. यात 17 प्रवाशी होते. तर, कंटेनर हैद्राबावरून नागपूर मार्गे राजस्थानला जात होता. यामध्ये 32 प्रवासी असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही ट्रक चालकांवर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरिक्षक सत्यवीर बंडीवार यांनी दिली.
या कामगारांमध्ये महिला पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. हिंगणघाट शहरातील मोहता शाळा आणि कमला नेहरू शाळा या दोन ठिकाणी दोन गटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व 57 मजुरांची जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यांना आणखी किती दिवस येथे ठेवण्यात येईल, यावर अद्याप प्रशासनाच्यावतीने काहीही सांगण्यात आले नाही. तर, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक भागात सामाजिक संस्था पुढे येत आहे. तर, कठोर वाटणाऱ्या पोलीस प्रशासनकडून माणुसकीची दर्शन होत आहे.