नागपूर - हिंगणघाट जळीतकांड घटनेचा शुक्रवारचा पाचवा दिवस आहे. डॉक्टरांनी आज मेडिकल बुलेटिनमध्ये पीडितेच्या आरोग्याची स्थिती कळवली. पीडितेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच कृत्रिम नळीद्वारे जेवण देण्यात येणार असून शरीरातील जंतूसंसर्गाबाबत तपासणी केल्यानंतर पुढील बाबी लक्षात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हिंगणघाट जळीतकांड : पीडिता शुद्धीवर मात्र, प्रकृती अद्यापही धोक्यात - व्हेंटिलेटर
डॉक्टरांनी आज मेडिकल बुलेटिनमध्ये पीडितेच्या आरोग्याची स्थिती कळवली आहे. पीडिता औषधांना प्रतिसाद देत असून ती शुद्धीवर आहे. पीडितेचा श्वासोच्छश्वास योग्य प्रकारे सुरू असला तरी अजूनही प्रकृती धोक्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी माहिती दिली
पीडिता औषधांना प्रतिसाद देत असून ती शुद्धीवर आहे. आज तिचे बर्न ड्रेसिंग करण्यात आले आहे. शिवाय हृदयाच्या ठोक्यांची गती काल वाढली होती. मात्र, आज ठीक आहे. कालपासून रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने औषधे सुरू केली आहे. त्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित आहे. पीडितीचे युरिन आऊटपुटही ठीक आहे. व्हेंटिलेटरची गरज पडली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेचा श्वासोच्छश्वास योग्य प्रकारे सुरू असला तरी अजूनही प्रकृती धोक्यात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Last Updated : Feb 7, 2020, 3:42 PM IST