वर्धा -हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले. आज (८ फेब्रुवारी)ला मध्यरात्री अंधारात न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुरुवातीला पोलीस कोठडी वाढवून मिळेल, असे वाटत होते. मात्र, अचानक न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसेच ओळख परेडसाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
हिंगणघाट जळीतकांड : आरोपीला न्यायालयीन कोठडी; मध्यरात्रीच न्यायालयीन कामकाज - हिंगणघाट जळीतकांड आरोपी
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याला घटनेच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरातील टाकळघाट येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली होती. आज मध्यरात्रीच न्यायालय सुरू करून पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
हिंगणाटमधील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रोष पसरला होता. तसेच ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले.
दरम्यान, घटनेतील आरोपी विकेश नगराळे याला घटनेच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरातील टाकळघाट येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली होती. आज मध्यरात्रीच न्यायालय सुरू करून पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपासात गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. ती देखील मान्य करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.