महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींचा शोध सुरू - physically abused in wardha

सहा जणांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. नराधमांनी या महिलेच्या नवऱ्याला बांधून, नवऱ्यासमोर हे कृत्य केले. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात घडली.

married woman physically abused by 6 people in wardha
वर्ध्यात विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

By

Published : Jun 28, 2020, 7:14 AM IST

Updated : Jun 28, 2020, 8:58 AM IST

वर्धा - सहा जणांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. नराधमांनी या महिलेच्या नवऱ्याला बांधून, नवऱ्यासमोर हे कृत्य केले. ही धक्कादायक घटना वर्ध्याच्या सावंगी मेघे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा शिवारात घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीचे आमिष दाखवून त्या महिलेला आरोपींनी कृषी विज्ञान केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतातील फार्म हाऊसवर बोलवले. पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत तिथे गेली. तेव्हा त्या आरोपींनी नवऱ्याला बांधले आणि त्याच्यासमोरच आळीपाळीने त्या महिलेवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी याची कुणासमोर वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

पीडितेने फार्म हाऊसवरून, थेट देवळी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याने, नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा -24 तास ऑक्सिजन देणारे पिंपळकुळातील झाडे लावा; मारुती चितमपल्ली यांचे आवाहन

हेही वाचा -जिल्हाधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील नगरपालिकेच्या कामांची केली पाहणी

Last Updated : Jun 28, 2020, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details