नागपूर :साहित्यमध्ये समाज प्रबोधन करण्याची शक्ती आहे पण अलीकडच्या काळात मात्र, वरपांगी साहित्य निर्मित केली जाते आहे. समाजप्रबोधन करेल अश्या साहित्याची निर्मिती झाली पाहिजे हाच संदेश देण्यासाठी वर्धा येथे सुरू झालेला 96 अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये एक साहित्यिक गाडगेबाांच्य फुलचंद नागटिळक वेशात आले आहेत. ते सोलापूर येथून आले आहेत. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत केली आहे.
गाडगेबाबांचा संदेश : फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी ३० साहित्य संमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकल ने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. नागटिळक यांना फक्त साहित्य संमेलनाची आवड आहे असे नाही. ते कीर्तन करतात. नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोगही फुलचंद पार पडतात. आत्तापर्यंत नटसम्राटचे हजारो एकपात्री प्रयोग नागटिळक यांनी सादर केले आहेत.
सामाजीक जनजागृती : शाळा-महाविद्यालय, वाड्या-वस्त्या, युवा फेस्टिवल, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी नटसम्राट या नाटकाचे एकपात्री प्रयोग सादर केले आहेत. शिक्षकांनी कसे शिकावावे आणि कसे शिकवे हा विषय घेऊन त्यांनी पाच हजार महाविद्यालयात जाऊन लेक्चर दिले आहेत. संत गाडगेबाबा यांचा पोशाख घालून अगदी ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला, साहित्य संमेलनाला जातात. बारावी नापास असलेल्या नागटिळकांची माय भूमी हा काव्यसंग्रह सोलापूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशित झाला आहे.
समाज उपयोगी लिखाण करावं : साहित्य संमेलनांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा मिळते,त्यामुळे साहित्यिकांनी समाज उपयोगी लिखाण करावं असं ते म्हणाले आहेत. वरपांगी साहित्यांची निर्मिती होते आहेत अशी खंत त्यांनी केली वरपांगी साहित्य निर्मिती होते आहे त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालंय खंत व्यक्त केली.
नागटिळकांचा जीवनप्रवास :नागटिळकांची कुसुमाग्रजांनी १९९७ साली भेट घेतली. त्यानंतर कुसुमाग्रजांनी ते करत असलेल्या कामाबद्दल नागटिळकांना शुभेच्छा पत्र लिहिलेले आहे. साहित्यातील दिग्गज लोक देखील फुलचंद नागटिळक यांना ओळखतात. आनंद यादव, जगदीश खेबुडकर, नारायण सुर्वे, यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर शांता शेळके, विंदा करंदीकर यांची भेट घेतली आहे. राजा मंगळवेढेकर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, फ.मू. शिंदे पासून ते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यापर्यंत सर्व लोक नागटिळक यांना ओळखतात. फुलचंद नागटिळक यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाच मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात त्यांनी आपली भूमिका सादर केली आहे. त्याचबरोबर प्रेम रंग,घुंगराची साथ, कुराड एक घाव प्रेमाचा, अशा चित्रपटांमध्ये तर हिंदीमध्ये असलेला बाबासाहेब या चित्रपटात त्यांनी आपली कला सादर केली. अगदी भारतात कुठेही साहित्य संमेलन भरवले तरी मी तेथे जाणार, अशी ठाम भूमिकाच नाग टिळकांची असते.