महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाटमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण; चौघांना अटक - चौघांना अटक

दिलीप दानव हा मध्यस्थी करायला गेले. यावेळी या चौघांनी संदीपला सोडून दिलीप दानव याला बांधकाम सहित्यातील फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.

मारहाण
मारहाण

By

Published : Aug 26, 2021, 11:45 PM IST

Updated : Aug 26, 2021, 11:53 PM IST

वर्धा - हिंगणघाट शहरात दत्त मंदिर परिसरात भांडण सुरू असतांना भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे. या व्यक्तीला फावडा आणि दगडाने मारुन जखमी करण्यात आले आहे. भांडण सोडवायला जाणे संबंधित व्यक्तीला महागात पडले. दिलीप दानव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण

काय आहे प्रकरण?

हिंगणघाट शहरात सकाळच्या सुमारास चौघे जण एका टपरीवर चहा घेत होते. यावेळी संदीप नामक व्यक्ती हा सुद्धा होता. संदिपचा काही कारणावरून चौघांशी करत वाद झाला. यावेळी आरोपी आदर्श गोलाईत, कुणाल लाजूरकर, सागर यादव, सोनू सोनकुसरे या चौघांनी मिळून संदीपला मारहाण करत होते. या दरम्यान दिलीप मारुती दानव (वय 45) हा त्याच परिसरात राहत असून त्यांच्या परिचयाचा व्यक्ती असलेला संदीपला मारहाण करताना दिसले. यामुळे दिलीप दानव हा मध्यस्थी करायला गेले. यावेळी या चौघांनी संदीपला सोडून दिलीप दानव याला बांधकाम सहित्यातील फावड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी दिलीप दानव हे तसेच पडून राहिले. परिचयाच्या व्यक्तींने त्यांना रुग्णलायत दाखल केले. याबाबत नायक पोलीस कर्मचारी महेंद्र आकरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कलम 326 अंतर्गत हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत चौघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -ती आली... तिने बघितले... ती उधळली... पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद

Last Updated : Aug 26, 2021, 11:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details