वर्धा - वर्ध्याच्या बरबडी रोडवरील एफसीआय गोडाऊन परिसरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी असलेल्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली. गुरुवारी क्षुल्लक कारणामुळे या दोन्ही कुटुंबात बाद झाला होता. प्रवीण मोहन कांबळे (30) असे व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तिघांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे.
सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टीत दीपक वैरागडे आणि रायकर हे कुटुंब राहत आहे. येथे मृत प्रवीण हा सुद्धा झोपडी बांधून राहायला आला. तेव्हापासून थोड्या थोड्या कारणांमुळे त्यांच्यात वाद होत होता. गुरुवारी दुपारी प्रवीण आणि रायकवार यांच्यासोबत कुत्र्याला दगड मारल्याचा कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद तेव्हा कसाबसा थांबला. त्यावेळी अनिता रायकवार (40) दीपक वैरागडे (37) योगराज रायकवार (20) यांनी प्रवीणला जीवे मारण्याची धमकी दिली.