महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन ट्रकची समोरासमोर धडक... एक ठार, तर तिघे अत्यवस्थ - major accident in wardha

पुलगाव मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना आज दुपारी पुलगाव-वर्धा मार्गावर मालकापूर ते केळापूर दरम्यान घडली. यात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. श्रीकांत गायकवाड असे मृताचे नाव आहे.

wardha accident news
दोन ट्रकची समोरासमोर धडक... एक ठार, तर तिघे अत्यवस्थ

By

Published : Nov 6, 2020, 8:42 PM IST

वर्धा - पुलगाव मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी पुलगाव-वर्धा मार्गावर मालकापूर ते केळापूर दरम्यान घडली. यात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. श्रीकांत गायकवाड असे मृताचे नाव आहे.

दोन ट्रकची समोरासमोर धडक... एक ठार, तर तिघे अत्यवस्थ

बारामती येथून एक ट्रक आटो रिक्षा भरून बिहारला जात होता. यावेळी समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली. ही घटना मलकापूर ते केळापूर दरम्यान घडली. त्यामध्ये एक जण ठार झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. यातील श्रीकांत गायकवाडचा मृत्यू झाला. नितीन गुलाब बनकर(वय - 27) हा जखमी झाला आहे. त्याला पुलगाव येथे प्राथमिक उपचारासाठी हालवण्यात आले. तर, दुसऱ्या ट्रकमधील ड्रायव्हर-क्लिनरवर देखील अद्याप उपचार सुरू आहेत.

पुलगाव मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

भर दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने ट्रकच्या दोन्ही कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला. दोन्ही ट्रक रस्त्यात असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून आली.

बारामती येथून एक ट्रक आटो रिक्षा भरून बिहारला जात होता. यावेळी समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली.
अपघात स्थळी पुलगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात संतोष राठोड, दीपक तुमडाम, चंदू खोंडे यांनी वाहतूक सुरळीत केली.

ABOUT THE AUTHOR

...view details