वर्धा - तालुक्यातील गिरोली येथे महाश्रमदान घेण्यात आले. यात गावकऱ्यांचा मदतील दूरवरून लोक पोहचले. पाणी फाऊंडेशनच्या दुष्काळाशी सामना करण्यासाठी हजारो लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हजारो लोकांच्या श्रमदानातून ३५० टँकर पाणि मिळवले. जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेसह चंद्रपूर जिल्ह्यातील काही लोकांनी सहभाग घेतला.
वर्ध्यात महाश्रमदान; हजारो लोकांच्या श्रमदानातून मिळवले ३५० टँकर पाणी - chandrpur
वर्ध्यातील वैद्यकीय जनजगृती मंच, फोनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्र, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बहुउद्देशीय विकास संस्था आणि संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेच्या सदस्यांसह अनेक सामाजिक संस्थांनी खारीचा वाटा श्रमदानातून देण्याचा प्रयत्न केला.

गिरोली गावातील लोकांनी त्यांचा दुष्काळ दूर करण्यासाठी पोहचलेल्या श्रमदात्यांचे ग्रामीण भागातील प्रथा जपत टीका लावून स्वागत केले. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत चालणाऱ्या श्रमदानात तब्बल हजारोंच्या संख्येने श्रमदाते लाभले. महिला पुरुषांसह अबाबवृद्धांनी हिरहिरीने हातात कुदळ, फावडे घेत या सहभाग घेतला. जमिनीला चर पडायला सुरुवात केली. काहींनी मिळणारे गोटे घेऊन कंटूरबांध तयार केले.
यात वर्ध्यातील वैद्यकीय जनजगृती मंच, फोनिक्स स्पर्धा परीक्षा केंद्र, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बहुउद्देशीय विकास संस्था आणि संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेच्या सदस्यांसह अनेक सामाजिक संस्थांनी खारीचा वाटा श्रमदानातून देण्याचा प्रयत्न केला.
या श्रमदानातून अवघ्या काही तासात गिरोली गावात तब्बल साडे तीनशे टँकर पाणी मिळवले. यात सकाळपासून झालेल्या श्रमदानात जवळपास ७०० घनमीटर काम पार पडले. यात ४५० मीटर दगडी कंटूर बांध तयार करण्यात आला. सलग समतर चर (CCT) २०० घनमीटर करण्यात आले. तसेच एलबीएस ५० घनमीटर काम केल्या गेले. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात वर्षभरात तब्बल ३५० टँकर या माध्यमातून मिळाले.