वर्धा -महागड्या गाड्यांमधून मध्यरात्री अवैध दारू वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नेल्या जातअसल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी नागपूर महामार्गावरील आरंभा टोलनाक्यावर एका गाडीमधून दारूच्या चार हजार बाटल्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गजानन संगेपवाड (वय 21 रा.बुट्टीबोरी) याला अटक करण्यात आली आहे.
नागपूरहून चंद्रपुरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरंभा टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनाच्या मागील सीटवर देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.