वर्धा - वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम ( Sevagram Ashram ) हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. महात्मा गांधीजींच्या ( Mahatma Gandhi ) सत्य, अहिंसा या विचार जाणून घेण्यासाठी देशातूनच नव्हे तर विदेशातून अनेक पर्यटक भेटी देत असतात. कोरोनामुळे मागील दोन वर्षात परदेशी पर्यटक आलेच नाही. ( Sevagram Ashram During Corona ) यासोबत जिथं सर्व चाके थांबली तिथं इतिहास सेवाग्राम आश्रमही मागील वर्षात बंद राहिले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सेवाग्राम आश्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आले. 1942ला 'चाले जावो'चा नारा देणारी बैठक स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे केंद्रबिंदू राहिले. आश्रमात अनेक महत्त्वाच्या बैठकीसह अनेक निर्णय घेतल्याचे इतिहासात नमूद आहे. वर्ध्याचे रेल्वे स्थानकावर गांधीजी सर्वप्रथम 1933ला वर्ध्यात आल्याची नोंद आहे. त्यानंतर ते पुन्हा 1934 मध्ये वर्ध्याचे जुने नाव पालकवाडी येथे सध्याच "एमगिरी"ला बजाज यांच्या घरी थांबले. हे दोन्ही स्थळी आजही आपल्याला त्याच्या आयुष्यातील पाऊल पाहायला मिळतात. त्या आठवणींचे जतन बजाजवाडी आणि एमगिरीमध्ये करण्यात आले आहे. यासोबतच मगण संग्रहालयात गांधींजीचा चरखा आणि चरख्याचे शेकडो कलाकृतीचे सुद्धा जतन करण्यात आले आहे.
वर्ध्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर तत्कालीन शेगांव म्हणजेच आजचे सेवाग्राम या नावाने ओळखले जाते. 30 एप्रिल 1936ला पहिल्यांदा सेवाग्रामला महात्मा गांधी आले. यानंतर ते इथे काही दिवस राहिले. त्यानंतर तब्बल 10 वर्ष 1946पर्यंत इथेच वास्तव्यास असल्याच सांगतात. मध्यंतरी जाणं येणं होतंच. मात्र, 10 वर्ष सर्वाधिक काळ या आश्रमात राहिले. सोबत सेवाग्राम आश्रम हे स्वातंत्र्य लढ्याची राजधानी म्हणून ओळख मिळाली.
इतिहासाचे साक्ष देणारे स्थळ आजही पर्यटक, गांधीजीच्या जीवनावर अभ्यास करणारे अभ्यासक येतात आणि महात्मा गांधी काय होते हे समजुज घेण्याचा प्रयत्न करतात.
सेवाग्राम आश्रम येथे कसे पोहोचतात?
सेवाग्राम आश्रम हे मध्य भागात स्थित आहे. इथे येण्यासाठी विमानाने यायचे झाल्यास नागपूर विमानतळावरून साधारण 75 ते 80 किलोमीटर टॅक्सीनेप पोहोचू शकतात. तसेच सेवाग्राम रेल्वे स्थानकावरुन किंवा वर्धा रेल्वे स्थानकवरून ऑटोने पोहोचता येते.
हेही वाचा -National Tourism Day 2022 : जगात एकमेव असणारी वेरूळ लेणी घडवते तीन धर्मांचे दर्शन
पर्यटकांची गर्दी -
दरवर्षी सेवाग्राम आश्रमाला साडे चार ते पाच लाख लोक तसेच विदेशी पर्यटकसुद्धा इथे भेटी देतात राहतात. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत यामध्ये प्रचंड घट झाली आहे. 2020मध्ये सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले तेव्हा आश्रमही बंद करावे लागले. आश्रम स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच असा प्रसंग आला होता. आता आश्रम सुरू असले तरी पर्यटकांना संख्या मात्र कमी झाली आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून येथील नव्याने सोयी सुविधांसह यात्री निवास बांधण्यात आले आहे. येथे अत्यंत कमी दरात राहण्याची जेवणाची व्यवस्था आश्रमाकडून केली जाते. परदेशी पर्यटकांचा आकडा हा तीन ते साडे तीन हजाराचा घरात असतो.
एरवी पर्यटकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते. खासकरून शाळेला ट्रिप मोठ्या प्रमाणात येतात. शाळा बंद असल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. आश्रमात प्रवेश निशुल्क आहे. इथे आल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या महिला मार्गदर्शिका त्यांना गांधी आश्रमाची स्थापना, बापूंचे कार्य, त्यांचा दिनक्रम, सूत कताई आदी विषयांवर माहिती देतात. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, इच्छा असणारे दानपेटीत दान देतात. त्यामुळे पर्यटकांची लुबाडणूक होत नाही आणि पर्यटन वाढीला मदत मिळते.
इथे पर्यटक देशभरातून येतात. सेवाग्राम आणि वर्धा रेल्वे स्थानकामुळे देशातल्या कुठल्याही भागात असला तर सहज येता येते. कारचालक, खानावळ, नाश्त्याची हॉटेल, चहा टपरी याना दोन पैसे मिळतात. शिवाय आश्रमातूनसुद्धा लाकडी चरखा, हळद दंत मंजन, गाईचे तूप या विक्रीतून पैसे मिळतात. तसेच इतरही लोकांना यामुळे रोजगार मिळतो.
पर्यटकांना ऑनलाईनसुद्धा राहण्याची व्यवस्था आता करण्यात आलेली आहे. यासाठी www. bapukutisevagram.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता. यावरवर काही फोन नंबरवर संपर्क करून राहण्याची, जेवणाची सोय होऊ शकते. कोरोनानंतर हळुहळु परिस्थिती सुधारणा होत असताना पुन्हा पर्यटनाला चालना मिळेल, अशी अशा व्यक्त केली जात आहे.
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे ट्रस्टी काय म्हणतात?
सेवाग्राम आश्रमात साधारण वर्षाला सहा ते आठ लाखापर्यंत दर्शनार्थी भेट देत असतात. 2020 मध्ये लागलेल्या लॉकडाऊननंतर यामध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात घटली. 2021 मध्ये साधारण 2 ते 3 लाखाचा घरात दर्शनार्थी आले असावे, असा अंदाज आहे. तेच ऑगस्ट 21 पासून दर्शनार्थीची संख्या वाढली होती. मात्र, जानेवारी 2022मध्ये यात पुन्हा संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. एकदा परिस्थिती पुन्हा सामान्य होताच मोठ्या संख्यने दर्शनाचे पाय हे सेवाग्राम आश्रमाकडे वळतील, अशी प्रतिक्रिया सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे ट्रस्टी अविनाश काकडे यांनी ईटीव्हीशी बोलताना दिली.