महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; नंदोरी परिसरातील घटना - वर्धा वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

समुद्रपूर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गांवरील नंदोरी जवळील मेंढूला पाटीपासून काही अंतरावर वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे.

wardha Leopard death news
wardha Leopard death news

By

Published : Sep 3, 2021, 4:14 AM IST

वर्धा -अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. समुद्रपूर तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गांवरील नंदोरी जवळील मेंढूला पाटीपासून काही अंतरावर हा अपघात घडला. या घटनेने परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. वाहन चालक मात्र लागलीच भरधाव वेगाने घटनास्थळावरू फरार झाला.

गाडीच्या धडकेने मृत्यू -

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, वनक्षेत्र अधिकारी विजय धात्रक पोहचले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच मृत्यू झालेला बिबट हा मादी असून अंदाजे 3 वर्षाचा असावा, असा अंदाज व्यक्त करत आहे. आज्ञात वाहनाने बेजबाबदार पणाने वाहन चालावत, त्या बिबट्याला जोरदार धडक दिली. यामुळे बिबट्याच्या डोक्याला खोलवर, जबरदस्त मार लागल्याने रक्तबंबाळ झाला होता.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details