महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पारधी बेड्यावर पोलिसांची छापेमारी; २ लाख ३५ हजारांचे दारुनिर्मिती साहित्य जप्त

समुद्रपूर पोलीसांच्या वतीने 'वॉश आऊट' मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी गणेशपूर पारधी बेड्यावर छापा टाकला असून दारू निर्मिसाठी लागणारे साहित्य जप्त करुन दारु भट्ट्या केल्या.

By

Published : Jun 11, 2019, 5:01 PM IST

जप्त केलेल्या साहित्यांबरोबर पोलीस कर्मचारी

वर्धा- जिल्ह्यात दारु बंदी असली तरी दारुविक्रेते त्याला न जुमानता सर्रास दारुनिर्मिती करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दारू विक्रीला आळा घालण्यासाठी समुद्रपूर पोलीसांच्या वतीने 'वॉश आऊट' मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी गणेशपूर पारधी बेड्यावर छापा टाकला असून दारू निर्मिसाठी लागणारे साहित्य जप्त करुन दारु भट्ट्य़ा नष्ट केल्या.

जप्त केलेल्या साहित्यांचे दृष्य


गणेशपूर पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात भट्ट्यासह दारुसाठा असल्याच्या माहितीवरून आज सकाळी ही करवाई करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा गूळ पोलिसांना कारवाईतून मिळाला आहे. त्यासोबतच सडव्यासाठी लागणारे प्लास्टिकचे ड्रम, दारू गाठण्यासाठी वापरणारे लोखंडी ड्रम, टोपले आदि साहित्य पोलिसांना मिळाले आहे. या मोहिमेत २ लाख ३५ हजारांचे साहित्य गणेशपुरे पारधी बेड्यावरू जप्त करण्यात आले आहे. यात नष्ट केलेले साहित्य हे वेगळेच आहे.


मोठ्या प्रमाणात दारू भट्ट्यावर गावठी दारू बनविली जाते. ही दारू अतिशय खराब दर्ज्याच्या गूळ आणि मोहन फुलांचा सडवा तयार करून केली जाते. त्यांनतर भट्टी लावत दारू गाळून विक्री केली जाते. गणेशपूर पारधी बेड्यावर ही दारू बनविण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलिसांकडून आज सकाळी ही वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली.


ही कारवाई ठाणेदार प्रवीण मुंडे याच्यासह डीबी पथक प्रमुख अरविंद येनूरकर यांच्या मार्गदर्शणात रवी पुरोहित, वैभव चरडे, आशिष गेडाम, नितेश मैदपवार, वैभव जगणे, प्रमोद जाधव यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details