वर्धा - हिंगणघाट जळीतकाडांतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत हिंगणघाट अधिवक्ता संघटनेने आज न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : खटला जलदगती न्यायालयात चालवणार, तर पीडितेच्या भावाला नोकरी
सदर प्रकरण हिंगणघाटच्या जलदगती न्यायालयातच चालवण्यात यावे, असा ठरावही आज अधिवक्ता संघाने पारित केला. शिवाय आरोपीचे वकीलपत्र कुणीही स्वीकारणार नाही, याबाबतचा निर्णय संघाने आधीच जाहीर केला आहे.
हेही वाचा - 'हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका'
हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेला आरोपी विक्की नगराळेने पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. कॉलेजमध्ये जात असताना पीडितेसोबत ही क्रृर घटना घडली होती. नागपुरातील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयामध्ये पीडितेवर उपचार सुरू होते. आज (सोमवार) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेने अखेर शेवटचा श्वास घेतला.