वर्धा- जिल्ह्यातील अनेक भागात मागील २-३ दिवसांपासून पावसाचा रिमझिम सुरू आहे. तर मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी समुद्रपूर तालुक्यात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासह सकाळपासून चांगला पाऊस झाल्याने लालनाला धरणाच्या साठ्यात वाढ होऊन ९५ टक्के साठा झाला आहे. यामुळे ५ दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले असून ३ हजार ५०० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
लालनाला प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा; पाण्याचा विसर्ग सुरू - महसूल विभाग
वर्धा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तर या जोरदार पावसामुळे लालनाला धरणाच्या साठ्यात वाढ होऊन ९५ टक्के साठा झाला आहे. यामुळे ५ दरवाजे ३० सेमीने उघडण्यात आले असून ३ हजार ५०० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
लालनाला प्रकल्पाची साठवण क्षमता २८ दलघमी आहे. मात्र, सकाळी ११ पर्यंत धरणसाठा ८५ टक्के इतका झाला होता. तसेच पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यासाठी ५ दरवाजे २५ सेमी उघडण्यात आले होते. तर आणखी पाऊस सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे यांनी दिली.
लालनाला प्रकल्पाचे गेट उघडल्याने चिखली असोला, डोंगरगाव, गंगापूर पोहरा, करून पवणगाव या गावांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. यासह महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आले असल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे.