महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wardha District Crime : अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात, महिला डॉक्टरास अटक - Illegal Abortion

आर्वी तालुक्यातील 17 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झाली. रविवारी (ता. 9 जानेवारी) संध्याकाळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालणारे आई, वडील आणि मुलीचा बेकायदेशीर गर्भपात ( Illegal Abortion ) करणाऱ्या महिला डॉक्टरला ( Lady Doctor Arrested ) आर्वी पोलिसांनी अटक ( Arvi Police ) केली आहे.

आर्वी पोलीस
आर्वी पोलीस

By

Published : Jan 10, 2022, 10:57 PM IST

वर्धा- आर्वी तालुक्यातील 17 वर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झाली. रविवारी (ता. 9 जानेवारी) संध्याकाळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालणारे आई, वडील आणि मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला आर्वी पोलिसांनी अटक केली ( Lady Doctor Arrested ) आहे. 30 हजार रुपये घेऊन गर्भपात ( Illegal Abortion ) केल्याचे समोर आल्याची माहिती आर्वी पोलीसांनी ( Arvi Police ) सोमवारी (दि. 10 जानेवारी) दिली.

बोलताना पोलीस निरिक्षक

आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17 वर्षीय मुलांचे 13 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. यात शरिरिक संबंध झाल्याने गर्भधारणा झाली. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सातत्याने सुरू होता. दरम्यान, त्या मुलीला गर्भधारणा झाली. पोटात दुखत असल्याचे मुलीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्यासोबत घडलेल्या कृत्याचा उलगडा झाला.

पीडित मुलीच्या वडीलाने घडलेल्या प्रकाराबाबत मुलाच्या वडीलास सांगितले. तेव्हा मुलाच्या वडीलाने तुझ्याच मुलीची समाजात बदनामी करतो, अशी धमकी दिली. चुपचाप रहा गर्भपात करण्याचा सगळा खर्च उचलतो, असे म्हणत मुलाच्या वडीलाने मुलास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीला गर्भपातासाठी आर्वी शहरातील डॉ. रेखा नीरज कदम यांच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले. या गर्भपातसाठी 30 हजार रुपये घेऊन बेकायदेशीर कृत्य करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक ज्योत्सना गिरी यांनी डॉक्टर महिलेला अटक केली. या प्रकरणात अशा पद्धतीने गर्भपात केल्याची घटना या रुग्णालयात पहिल्यांदा उघडकीस आली. पण, यापूर्वी असेच प्रकार झाले असावे, अशी शंका व्यक्त आर्वी पोलिसांकडून केली जात आहे.

हेही वाचा - Wardha Crime: धक्कादायक: संशयी पत्नीने पतीस करायला लावला शेजारच्या मुलीवर बलात्कार!

ABOUT THE AUTHOR

...view details