वर्धा- दारोडा गावामध्ये सध्या वातावरण संतप्त झालेले आहे. महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आमच्या लेकीला झालेल्या वेदना त्या आरोपीला द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे. दरम्यान, पीडितेचा मृतदेह तिच्या घरी पोहचला असून गावात तणावाचे वातावरण आहे.
लेकीला झालेल्या वेदना आरोपीला द्या; महिला संतप्त - हिंगणघाट जळीतकांड
दारोडा गावामध्ये सध्या वातावरण संतप्त झालेले आहे. महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आमच्या लेकीला झालेल्या वेदना त्या आरोपीला द्या, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.
हिंगणघाटमधील महिलांच्या प्रतिक्रिया
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पेट्रोल टाकल्यापासून ते पीडितेच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा घटनाक्रम...
पीडितेला भोगाव्या लागलेल्या वेदनांची जाणीव त्या आरोपीला व्हावी. यासाठी त्यालासुद्धा जाळायला पाहिजे, असा राग गावातील महिला-पुरुष व्यक्त करत आहेत. त्याला केवळ फाशीची शिक्षा देऊन होणार नाही तर, त्यालासुद्धा त्या वेदनांची जाणीव झाली पाहिजे. यासाठी महिला संतप्त होत रस्त्यावर उतरल्या आहेत.
Last Updated : Feb 10, 2020, 2:52 PM IST