वर्धा - महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण महाराजला बुधवारी वर्ध्यातील न्यायालयात ( kalicharan Maharaj In Wardha ) हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने कालीचरण महाराजला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ( Kalicharan Maharaj Custody ) आहे. त्यानंतर कालीचरण महाराजला न्यायालयीन कोठडीसाठी रायपूरला रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस अटकेत असणाऱ्या कालीचरण महाराजने 'जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये'चा ( Kalicharan Maharaj New Slogan ) नारा दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण महाराजवर वर्धा पोलीस ( Kalicharan Maharaj Hate Speech Mahatma Gandhi ) ठाण्यात भादवीच्या कलम 153,502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासाठी त्याला रायपूरहून आज सकाळी वर्ध्याचा सेवाग्राम पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कालीचरण महाराजला न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती श्रीमती एम वाय नेमाडे त्याला 14 दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली. पण, मूळ वादग्रस्त वक्तव्यातील गुन्हा हा रायपूरला दाखल आहे. त्यामुळे कालीचरण महाराजला रायपूरच्या सेंट्रल जेलला पुन्हा पाठवण्यात आले.