वर्धा- कारंजा शहरातील गवंडी रस्त्यावरील चौधरी ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी 4 लाखाचे चांदीचे दागिने लपास केले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पाच चोरट्यांचा समावेश असून ते परिकरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
दागिन्याच्या दुकानात चोरी; चार लाखाचे चांदीचे दागिने लपास, मात्र 40 लाखाचे सोन वाचले - Silver Jewelry looted
दुकानाचे लोखंडी गेट तोडून चोर आत शिरले होते. त्यांना दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले चार लाखांचे चांदीचे दागिने मिळविण्यात यश आले. मात्र त्यांना सोन ठेवलेली तिजोरी फोडता न आल्याने चाळीस लाखाचे सोन वाचले.
दुकानाचे लोखंडी गेट तोडून चोर आत शिरले होते. त्यांना दुकानाच्या शोकेसमध्ये ठेवलेले चार लाखांचे चांदीचे दागिने मिळविण्यात यश आले. मात्र त्यांना सोन ठेवलेली तिजोरी फोडता न आल्याने चाळीस लाखाचे सोन वाचले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने दुकानाच्या मालकाने याबाबत पोलिसात तक्रार दिली असता त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. दुकानात सीसीटीव्ही होते, पण चोरट्यानी सीसीटीव्ही तोडून नेले. त्याचबरोबर ते रेकॉर्डींग हार्डीक्स सुद्धा घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्यांनी लपास केलेल्या 4 लाखांच्या दागिण्यांमध्ये चांदीची पैंजण, अंगठ्या, हार यासह चांदी निर्मित इतर दागिण्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही हार्डीस्क जरी चोरून नेली असली, तरी परिसरातील इतर सिसिटीव्हीमध्ये त्यांची हालचाल कैद झाली आहे. याच मार्गावर असलेल्या कोंढाळी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन दुकाने फोडण्यात आली होती. या घटने मागे याच चोरट्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. आता चक्क दागिन्याचे दुकान फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारंजा पोलिसांनी सतर्कता बाळगत याकडे लक्ष देऊन चोरट्यांना जेरबंद करावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.