वर्धा- महात्मा गांधीजींना १५० व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांतून आदरांजली वाहण्यात येत आहे. अशातच जालना येथील पेशाने वकिल असलेले राजेश ढवळे यांनी ३५० किलोमीटर अंतराची पायदळ दौड करत गांधीजींना आदरांजली वाहिली. ढवळे यांनी ही दौड ८ दिवसांमध्ये पूर्ण करत आज (बुधवार) सेवाग्राम गाठले.
गांधी जयंतीच्या निमित्ताने कुणी सूतकताई करून, कुणी स्वच्छता अभियान राबवून तर कुणी उपवास करून गांधीजींना आदरांजली वाहत आहेत. पण जालना येथील वकील राजेश ढवळे यांनी तब्बल ३५० किलोमीटर अंतर पायदळ दौड करत पूर्ण केली.
जालना येथून ढवळे यांनी २५ सप्टेंबर या तारखेला गांधी दौड सुरू केली होती. ते आज ३५० किलोमीटर अंतर पार करुन वर्ध्यात पोहोचले. हे अंतर पार करायला त्यांना ८ दिवसांचा कालावधी लागला. रोज साधरण ५० किलोमीटर अंतर पार करत आज सेवाग्राम पावन भूमीत पोहचले.