वर्धा- हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेच्या न्यायलायीन कोठडीत 4 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ लागत असल्याने न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेच्या न्यायलायीन कोठडीत वाढ - वर्धा जिल्हा बातमी
पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी आरोपी विकेशच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
विकेश नगराळे
सध्या आरोपी हा नागपूर कारागृहात आहे. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी आरोपी विकेशच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
आरोपीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग न झाल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. केवळ न्यायालयीन आदेशाने कोठडीत वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.