वर्धा - महावितरण कंपनीकडून जुने मीटर खराब असल्याचे सांगत नवीन मीटर लावण्यात आले आहेत. हे नवीन मीटर खराब आहेत. या नवीन मीटर बसवल्यानंतर युनिटमध्ये वाढ झाल्याने जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप युवा परिवर्तन संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी घेराव घालण्याचा इशारा युवा परिवर्तन संघटनेने दिला आहे.
नव्याने लावलेल्या विद्युत मीटरमुळे बिलात वाढ; नागरिकांमधून संताप
महावितरण कंपनीकडून जुने मीटर खराब असल्याचे सांगत नवीन मीटर लावण्यात आले आहेत. हे नवीन मीटर खराब आहेत. या नवीन मीटर बसवल्यानंतर युनिटमध्ये वाढ झाल्याने जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप युवा परिवर्तन संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जळपास तीन लाखांच्या घरात विद्युत कनेक्शन आहे. सगळीकडे तीन महिन्यापूर्वी महावितरणने विद्युत मीटर बदलले जात आहेत. मीटर खराब असून मीटरचे पैसे सुद्धा जनतेकडून घेण्यात येत आहे. या मीटरमधून चुकीचे रिडींग येत त्यामुळे मीटरचे बिल वाढवून येत आहे. या माध्यमातून वर्ध्यात दर महिन्याला १० ते १२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप युवा परिवर्तनचे निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी लवकरच आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
संघटनेकडून ऊर्जामंत्री यांना दिलेल्या क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणातून जनतेची पिळवणूक करून लुटणाऱ्या पैशात ऊर्जामंत्रीही सहभागी तर नाही ना? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.