वर्धा -मास्क न लावल्याने दंड भरण्यास सांगितलेल्या युवकांनी चक्क आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतलले असून यातील एक जण हा अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान आर्वीच्या शिवाजी चौकात विनामास्कविरोधी मोहिमेची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे पाठकासोबत गेले. यावेळी शिवाजी चौकात एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी ओळख सांगत विनामास्कविरोधी कारवाईबाबत माहिती दिली. यात आवेश खान जाबीर खाँ पठाण असे एका आरोपीचे नाव आहे.