वर्धा- वर्ध्यात आज मंदिरे खुले करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तालुक्यातील संत लहानुजी महाराजांच्या मंदिराबाहेर भाजपाचे आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भजन-कीर्तन करत हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मंदिरातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील सहा महिन्यापासून मंदिर बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासह मंदिरे खुले करण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली.