वर्धा :वर्धा-आर्वी मार्गावरील चांदणी फाट्यावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात वाहनवरील नियंत्रण सुटून वाहन पलटी होत रस्त्याच्याकडेला झुडपीत गेले. यावेळी वाहनात असणारे 10 जण जखमी झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयूर अशोक पेठे अस मृत युवकाचे नाव आहे. सर्व यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
भरधाव वाहनावर नियंत्रण सुटल्याने अपघात, एक ठार दहा जखमी हेही वाचा -पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव, 24 तासात पतीताब्यात
यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील कुटुंब कामानिमित्य चांदणी फाट्यावरून खरांगणाच्या दिशेने जात असताना वाहन भरधाव वेगाने जात होते. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम असल्यान रस्त्याचे दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहन चालकाचे भरधाव वाहनवरून नियंत्रण सुटले. यामुळे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होत रस्त्याच्याकडेला जाऊन पलटी झाले. हा अपघात इतका भीषण होता वाहन पलटी झाल्याने वाहनातील प्रवाशी अडकून राहिले. मार्गावरून जात असलेल्या जागरूक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहचत जखमींना बाहेर काढले.
यावेळी खरांगणा पोलीस तात्काळ पोहचताच पोलीस वाहन तसेच 108 रुग्णवाहिकेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. यात गंभीर जखमी झाल्याने मयूर पेठे नामक युवक याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. क्रेनच्या साह्याने अपघातातील वाहन हलवण्यात आले.
हेही वाचा - अजगराची हत्या लाईव्ह करणं पडलं महागात, पाच जणांना अटक