वर्धा - मुंबईचा कोरोनाचा मृत्यूदर हा साडेपाच टक्के आहे, म्हणजेच ग्लोबल अॅवरेजपेक्षाही जास्त असल्याची सध्या परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या मृत्यू दराचीही तिच परिस्थिती आहे. ज्यावेळी चाचण्या कमी होतात त्यावेळी संसर्ग होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण हे जास्त असते. यामुळे दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चाचण्या वाढवाव्या लागतील. जोपर्यंत चाचण्या वाढवल्या जाणार नाही तोपर्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे दिली.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही वाचा -सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्य सरकारने चाचण्या वाढवल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील बाधितांची टक्केवारी पाहता मुख्यमंत्री यांना पत्र लिहून महाराष्ट्र आणि मुंबईबाबतची परिस्थिती लक्षात आणून दिली आहे. महाराष्ट्रमध्ये इन्फेक्शन दर हा 19 टक्के आहे, मुंबईत तो 18 टक्के असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
आरटीईत प्रवेश देऊन सरकार उपकार करत नाही -
आरटीई हा हक्क आहे, यात सरकार उपकार करत नाही. हा भारताच्या संसदेने त्या गरीब विद्यार्थ्यांना दिलेला हक्क असून, तो त्यांना मिळालाच पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.