वर्धा- कोरोनाचा सर्वाधिक धोका क्षयरोगाच्या रुग्णांना असतो. त्यामुळे जिल्ह्यातील क्षयरोगाच्या रुग्णांसाठी इम्युनिटी बूस्टर किट तयार करण्यात आली आहे. ही किट जिल्ह्यातील ९६० रुग्णांना घरपोच दिली जाणार आहे. कोरोनाच्या साथीत क्षयरोग असणाऱ्यांना दिलसारुपी शस्त्र उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कक्षात या किट क्षयरोग अधिकारी डॉ. सीमा यांना सोपवण्यात आल्या आहेत. पुढे त्या घरपोच पोहोचवल्या जाणार आहे.
वर्ध्यात क्षयरोगांच्या रुग्णांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'इम्युनिटी बूस्टर किट' कोरोनाचा सर्वाधिक धोका हा उच्च रक्तदाब, क्षयरोग, मधुमेह, कर्करोग यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांना आहे. यासह गरोदर माता, वृध्द नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न महत्वाचा आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाऊल उचलले आहे. यात क्षयरोगाच्या रुग्णांसाठी मोफत इम्युनिटी बुस्टर किट तयार करण्यात येणार आहे.काय असणार इमिन्यूटी बूस्टर किटमध्ये -या किटमध्ये प्रोटिन पावडर, व्हिटामिन गोळ्या, सॅनिटायझर, पुन्हा पुन्हा वापरता येईल असे मास्क, आरोग्याची काळजी घेण्यासंबंधी माहिती दर्शन पुस्तिकेचा समावेश असणार आहे. या व्यतिरिक्त या किटमध्ये निश्चय पोषण योजनेअंतर्गत रुग्णांच्या बँक खात्यात दरमहा 500 रुपये जमा करण्यात येत आहे.संकल्पना कशी आली पुढे-जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांचे सर्वेक्षण पुर्वीच करण्यात आले होते. लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर औषधोपचार देणे गरजेचे आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी हायजीन किटची संकल्पना मांडली. यावर प्रशासनाच्या मदतीने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांनी प्रत्यक्षात ही संकल्पना राबविली. या किट तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी अनुदान दिले. इम्युनिटी बुस्टर किट जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. सिमा मानकर यांना सुपुर्त केल्या गेल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा कार्यक्रम समन्वयक सुमंत ढोबळे, पीपीएम समन्वयक जितेंद्र बाखडे उपस्थित होते.