महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात चार लाखांची अवैध विदेशी दारू जप्त..., शिमग्याच्या पार्श्वभूमीवर कारवाई - वर्धा बातमी

शिंमग्याच्या सणाला मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. त्यामुळे पोलिसांची अशा अवैध दारू विक्रीवर करडी नजर आहे. अशातच गुप्त माहितीच्या आधारे दयालनगर परिसरात एक कुलूपबंद घरात मोठा दारुसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष घराचे कुलूप तोडून घराची झडती घेतली. यात विदेशी कंपनीच्या 42 दारूच्या पेट्या आढळल्या.

illegal-wine-seized-in-wardha
चार लाखांची अवैध विदेशी दारू जप्त...

By

Published : Mar 7, 2020, 12:36 PM IST

वर्धा- दयालनगर परिसरात एका बंद घरातून साडेचार लाख रुपये किमतीची तब्बल 42 पेट्या विदेशी दारू जप्त केली आहे. नरेश दोडानी याच्या घरात ही दारू आढळली असून नरेश फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चार लाखांची अवैध विदेशी दारू जप्त...

हेही वाचा-रंग माझा वेगळा..! 'नैसर्गिक रंग निर्मितीसाठी मंद्रूपच्या प्राथमिक शाळेत कार्यशाळा

पोलिसांनी नरेश दोडानी याच्या घराची झडती घेतली. यात विदेशी दारुच्या 42 पेट्या आढळून आल्या आहेत. या कारवाईत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नरेश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी दिली.

शिंमग्याच्या सणाला मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. त्यामुळे पोलिसांची अशा अवैध दारू विक्रीवर करडी नजर आहे. अशातच गुप्त माहितीच्या आधारे दयालनगर परिसरात एक कुलूपबंद घरात मोठा दारुसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष घराचे कुलूप तोडून घराची झडती घेतली. यात विदेशी कंपनीच्या 42 दारूच्या पेट्या आढळल्या.


पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या उपस्थितीत पोलीस कर्मचारी सचिन सोनटक्के, दिनेश तुमाणे, सचिन दवाळे, अमर पाटील, सलमान दाऊद, कारभारी घुगे यांंनी ही कारवाई केली.



ABOUT THE AUTHOR

...view details