वर्धा- पवनार येथील धाम नदी लगतच्या बेशरम झाडाच्या परिसरात सांगाडा आढळून आला आहे. नदीपात्रालगत मानवी हाडाचा सांगाडा सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून या सांगाड्यावर काही प्रमाणात मांस आढळून आले. हा सांगाडा अंदाजे ३५ ते ४० वर्षाच्या व्यक्तिचा असल्याचे बोलाले जात आहे. मात्र, अद्याप पुरुष की, महिलेचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
सांगडा मिळालेल्या परिसरात सेवाग्राम पोलिसांनी शोधाशोध केली. नदीकाठचा परिसर पिंजून काढला. एरवी या परिसरात कोणीच जात नसल्याने काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे या सांगाड्याजवळ ओळख पटनारे कोणतेही ओळखपत्र किंवा कपडे आढळुन आले नाही. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय बोठे यांनी स्टाफसह पंचनामा केला. त्यानंतर ओळख पटवविण्यासाठी सांगाडा सेवाग्राम रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेण्यात आला.
सेवाग्राम रुग्णलायात होणार सांगाड्याची प्राथमिक ओळख
वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात या सांगाड्याचे शवविच्छेदन होणार आहे. येथील अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मृत्यू किती दिवसांपूर्वी झाला होता, हा सांगाडा स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे हे सुद्धा शवविच्छेदन अहवालावरून कळणार आहे.