महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यातील पिपरी-मेघे विवाह सोहळा : नवरदेवानंतर पत्नी आणि आईला कोरोनाची बाधा - groom found corona positive wardha

पिपरी मेघे येथे 30 जूनला विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नवविवाहित नवरदेव 7 जुलैला कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर बाधिताच्या निकटसंपर्कातील 30 जणांचे नमुने घेण्यात आले. यात 10 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी नवविवाहिता (23) आणि मुलाची आई (51) या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

his wife and mother found corona positive after groom found corona positive wardha
नवरदेवानंतर पत्नी आणि आईला कोरोनाची बाधा

By

Published : Jul 10, 2020, 10:59 AM IST

वर्धा - पिपरी-मेघेच्या शिवराम वाडीतील विवाह सोहळ्यातील आतापर्यंत ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला नवविवाहित नवरदेव बाधित झाल्याने खळबळ उडाली होती. आता नवविवाहित नवरी आणि मुलाची आईसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शुक्रवारी आला. दोन्ही बाधितांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी दिली.

पिपरी मेघे येथे 30 जूनला विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नवविवाहित नवरदेव 7 जुलैला कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर बाधिताच्या निकटसंपर्कातील 30 जणांचे नमुने घेण्यात आले. यात 10 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी नवविवाहिता (23) आणि मुलाची आई (51) या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच यातील हाय रिस्कमधील 20 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. तर लो रिस्कमध्ये जवळपास 100 जणांचा समावेश आहे. यामुळे पुढील काळात आणखी किती जणांना कोरोनाची लागण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यामुळे नवरदेवाला कोरोनाची बाधा; नियमांचे उल्लंघन होणाऱ्यांवर कडक कारवाई

या विवाह सोहळ्याने आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सर्वाधिक लोकांना गृहविलगीकरणात राहावे लागणारे हे प्रकरण ठरणार आहे. कारण यात जवळपास 100 जणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणानंतर प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने पुढील काळात होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर निर्बंध घातले आहेत. शिवाय नियम मोडल्यास कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

  • लग्नाच्या कंदोरीसह जेवणाला जाणारे झाले क्वारंटाईन -

या प्रकरणात प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदा दोन कंटेनमेंट झोन तयार करावे लागले आहे. यात विवाह सोहळ्यात दोन भागातील कुटुंब आहे. एक झोन हा कोरोनाबाधित आढळलेल्या घराजवळच्या 33 घरातील लोकांचा आहे. यात 126 लोकांचा समावेश आहे. तर यासोबतच नंदनवन परिसरातील 8 घरातील नागरिकांना कंटेनमेंट झोनमध्ये राहावे लागणार आहे. यासोबतच पिपरी-मेघे परिसरातील 33 हजार नागरिकांना तीन दिवस संचारबंदीत राहावे लागणार आहे.

  • लग्नसोहळा होताना पथक नजर ठेवणार -

यापुढे होणाऱ्या विवाह समारंभात नियमांचे पालन होते को नाही हे पाहण्यासाठी महसूल पोलीस आणि नगर परिषद, तथा ग्रामपंचायत सोबतीला आरोग्य विभागाचे पथक लग्न समारंभात असणार आहे. विवाहात लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत का? यावर हे पथक लक्ष ठेवून असणार आहे. नियम मोडल्याचे आढळल्यास आर्थिक दंड, फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी माधुरी बोरकर, बीडीओ इसाये, नायब तहसीलदार स्वप्नील डीगलवार आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details