महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'ती' रडायला लागली... अन कोर्टाचे कामकाज थांबले...! - Vikesh Nagrale

रोपी विकेश नगराळे हा घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून पीडितेला त्रास देत असल्याची माहिती त्यांनी दिली. लग्न न केल्यास मारून टाकण्याची धमकीही आरोपीने अशीही धमकी दिली होती. अखेर तेच केले. साक्ष नोंदवताना हा प्रसंग डोळ्यापुढे आला आणि पीडितेची आई रडायला लागली. प्रकृती बिघडल्याने काही काळ कामकाज थांबवण्यात आले. 15 मिनिटानंतर बचाव पक्षाकडून पीडितेच्या आईची उलट तपासणी करण्यात आली.

Hinganghat lecturer burning case trial
'ती' रडायला लागली... अन कोर्टाचे कामकाज थांबलं...!

By

Published : Jan 14, 2021, 6:45 AM IST

Updated : Jan 14, 2021, 8:16 AM IST

वर्धा- हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी न्यायालयीन कामकाज सुरू असून या खटल्या दरम्यान बुधवारी पीडितेच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. सलग तीन दिवस या प्रकरणावर न्यायालयीन कामकाज चालले कामकाज चालले असून आता पुढील कामकाज फेब्रुवारी महिन्यात 15, 16 आणि 17 रोजी होणार आहे. बुधवारी पीडितेच्या आईस साक्ष देताना मुलीसोबत झालेल्या अत्याचाराचा प्रसंग आठवल्याने अश्रू अनावर झाले. त्यामुळे न्यायालयानेही आपले अन रडायला लागली. यामुळे न्यायालयाचे कामकाज थांबवण्यात आले.

'ती' रडायला लागली... अन कोर्टाचे कामकाज थांबले...!
हिंगणघाट जळीतकांड घटनेने महाराष्ट्र हादरला होता. पीडितेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याच्या प्रयत्न करण्याच्या तो प्रसंग ऐकला तरी अंगावर शहारा येतो. यात आपल्या लेकीला गमावणाऱ्या पीडितेच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी आरोपी विकेश नगराळे हा घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून पीडितेला त्रास देत असल्याची माहिती त्यांनी दिली. लग्न न केल्यास मारून टाकण्याची धमकीही आरोपीने अशीही धमकी दिली होती. अखेर तेच केले. साक्ष नोंदवताना हा प्रसंग डोळ्यापुढे आला आणि पीडितेची आई रडायला लागली. प्रकृती बिघडल्याने काही काळ कामकाज थांबवण्यात आले. 15 मिनिटानंतर बचाव पक्षाकडून पीडितेच्या आईची उलट तपासणी करण्यात आली.
अॅड भुपेंद्र सोनी
बचावपक्षाच्या वकिलांनी पीडितेच्या आई वडिलांची माफी मागितली...मी ही एक माणूस आहे. मलाही भावना आहे. घटना निंदनीय असली तरी बचावपक्षाचा वकील आहे. मला उलटतपासणी करावी लागेल म्हणून मला माफ करा, असे पीडितेच्या आई वडील साक्ष देण्यासाठी आले असताना माफी दिल्यावर मी त्यांची उलटतपासणी केली असल्याचे अॅड भुपेंद्र सोनी म्हणाले. मृत मुलीच्या आई-वडिलांना प्रश्न विचारतांना माणुसकी म्हणून माफी मागितल्याचेही बचावपक्षाचे वकील भुपेंद्र सोनी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.आईची दीड तास चालली साक्ष..

या प्रकरणात आतापार्यंत 7 जनांची साक्ष तीन दिवसांच्या कालावधीत नोंदवण्यात आली. यात बचाव पक्षाकडून उलटतपासणीही घेण्यात आली. यात तिसऱ्या दिवशी आईची साक्ष घेण्याचे कामकाज जवळपास दीड तास चालले. यात आरोपीची ओळखपरेड करणारे नायब तहसीलदार विजय पवार यांची साक्ष नोंंदवाण्यात आली. यात न्यायालयाचे कामकाजाची वेळ संपल्याने उलट तपासणीचे कामकाज पुढील तारखेवर होणार असल्याची माहिती अॅड भुपेंद्र सोनी यांनी दिली.

कामकाज डिजिटल स्क्रीनवर दाखवण्याची विनंती मान्य...

या प्रकरणात बचावपक्षाचे वकील भूपेंद्र सोनी यांनी कामकाज लिहून डिजिटल स्क्रीनवर न्यायालयात दाखविण्यात यावे अशी विनंती केली. ही विंनती अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश माजगावकर यांनी मान्य केली. यात संपूर्ण नोंदी डिजिटल स्क्रीनवर दाखविण्यात आल्या.

आरोपी विकेशे स्वत:च्या मुलीला हातात घेताच तोही रडला.....

या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेला न्यायालयात हजर करण्यात आले. यात कामकाजा दरम्यान मध्यंतराच्या वेळी त्याला त्याच्या कुटुंबीयांना भेटू देण्यात आले. यावेळी विकेश हा पत्नी तसेच लहान मुलीला भेटला. यावेळी मुलीला हातात घेतले असता, त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. बुधवारी न्यायालयात आरोपी आणि तक्रारदार पक्षात दोन्ही बाजूने वातावरण भावूक दिसून आले.

या प्रकरणात यांची नोंदवली साक्ष...

या प्रकरणात तीन दिवसात सात जनांची साक्ष नोंदवली. यामध्ये शवपरीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख, मातोश्री कॉलेजचे प्राचार्य डॉ.उमेश तुळसकर आणि घटनास्थळवरील पंच सचिन बुटले तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभय तळवेकर, पीडितेचे वडील, नायब तहसीलदार पवार, यांच्या साक्ष नोंदवण्यात आली.

खटल्याच्या कामकाज सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणी लवकरात लवकर कामकाज संपवून निकाल लागण्यासाठी प्रयत्न करणार आल्याचे म्हटले. तसेच त्यांना सहकारी सरकारी वकील अॅड.प्रसाद सोईतकर यांनी भाग घेतला. यात आरोपीच्या वतीने अॅड.भुपेंद्र सोनी यांनी सहभाग घेतला.

Last Updated : Jan 14, 2021, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details