महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे देणार - पोलीस अधीक्षक - hinghanghat burnt case

हिंगणघाट येथील प्राध्यापक युवतीला जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विकी नगराळे याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

police sp
पोलीस अधीक्षक बसवराज तेली

By

Published : Feb 4, 2020, 7:43 PM IST

Updated : Feb 4, 2020, 8:27 PM IST

वर्धा- हिंगणघाट येथील प्राध्यापक युवतीला जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विकी नगराळे याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय (डीवायएसपी) पोलीस अधिकाऱ्याकडे देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

पोलीस अधीक्षक बसवराज तेली

हेही वाचा -हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

मोटारसायकल, मोबाईल फोन, कपडे तसेच इतर पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता बाळगून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तसेच तपासासाठी तयार केलेली टीम तसेच पोस्को प्रकरणाचा तपास करणारी टीम त्यांना सहकार्य करेल, असे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले.

Last Updated : Feb 4, 2020, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details