वर्धा- कुठल्याही घटनेत पीडितेचा मृत्यू झाला असल्यास मृत्युपूर्व जबाबाला विशेष महत्व असते. यामुळे हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात पेट्रोल टाकून जळालेल्या घटनेत मृत्यूपूर्व जबाबाला सुद्धा म्हत्व असणार आहे. पण, या प्रकरणात मृत्युपूर्व जबाब नोंदवले का? हा प्रश्न आहे. या प्रकरणात मग कुठले जबाब हे मृत्युपूर्व जबाब समजले जाईल हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
हिंगणघाट जळीतकांड हे ३ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या दरम्यान घडले. या घटनेतील पडितेला नंतर हिंगणघाट रुग्णालयात प्रथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला हलवण्यात आले. अखेर सात दिवस मृत्यूशी झुंज देत दहा तारखेला तिने शेवटचा श्वास घेतला. तिची प्रकृती गंभीर असताना देखील पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला. मात्र, जबाब नोंदवताना पीडिता जबाब देण्यास सक्षम आहे असे नमूद असलेल्या डॉक्टरांच्या एका वैदकीय तपासणीचे प्रमाणपत्र गरजेचे असते. सोबतच पीडितेचा जबाब न्यायदंडाधिकारी अधिकाऱ्यांच्या समक्ष घ्यावे लागते. मात्र, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात याच्या उलट कृती झाली.