महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह - corona update wardha

ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला. एका मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर वाशिमच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे नमुने निगेटीव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

corona in wardha
वर्ध्यात दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह

By

Published : May 14, 2020, 8:12 AM IST

Updated : May 14, 2020, 1:58 PM IST

वर्धा - गेल्या आठवड्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव झाला. हिवरा तांडा आणि वाशिमच्या व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर या रुग्णांच्या संपर्कातील ५९ व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. हे सर्वच अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात हिवरा तांडा येथील एका महिलेचा मृत्यनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच वाशिम येथील रुग्ण वर्धेत उपचारासाठी आला असताना त्याचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन्ही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 59 व्यक्तींचे स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी सेवाग्राम महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते.

त्यापैकी सुरवातीला 41 व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित 18 अहवालसुद्धा आज प्राप्त झाले असून ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. या सर्व अहवालातही कोणीही कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाशीम येथील रुग्णाची प्रकृती ठणठणीत व्हावी आहे. जिल्हा पुन्हा ग्रीनझोनमध्ये जावा, अशी आशा केली जात आहे.
Last Updated : May 14, 2020, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details