महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने ६ तालुक्यात अतिवृष्टी; सरासरीच्या पावसाने तूट निघाली भरून

मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले.

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी

By

Published : Jul 31, 2019, 2:06 PM IST

वर्धा- येथे मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यात मागील २४ तासात पावसाने जोरदीर बॅटींग केली. यात सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मात्र, आष्टी आणि कारंजा तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी
वर्ध्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यात शेतकऱ्यांचे पेरणी करूनही उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले. मागील २४ तासात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यात ४६ टक्के पाऊस झाला. एका दिवसात १० टक्के पावसाने सरासरीत पडलेली तूट भरून निघाली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या पावसात २१२ मिमी पाऊस झाला होता. एका दिवसात ही सरासरी भरून निघाली असून ४३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात चार तालुक्यात १०० मिलीमीटरच्या वर पाऊस झाला. देवळी तालुक्यातील १२४.१८ मिली, आर्वी येथे १२४.०६, वर्धा ११७.८४, समुद्रपूर ११७.४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात ७८.०६ मिमी, हिंगणघाट येथे ७८.०६, आर्वी, तर कारंजा ५०.६८, आष्टी ५५ मिली एवढा कमी पावस झाला आहे.
यामुळे जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली असून धरणाची पातळी भरून निघण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच पाण्याच्या प्रश्न सुटायला अजून पावसाची गरज आहेच.

ABOUT THE AUTHOR

...view details