वर्धा - जिल्ह्यातील काही भागात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणाने कमालीचा बदल जाणवत आहे. यातच रात्रीपासूनच काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. तर काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक तयार झालेल्या वातावरणाने सूर्याचे दर्शन झाले नाही. यामुळे सर्वत्र धुके पसरलेले आहे. या पावसाचा पिकांना फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच यामुळे भरदिवसा काळोख पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आज (गुरुवार) सकाळी कारंजा, आर्वी, आष्टी, हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर देवळी, सेलू आणि वर्धा तालुक्यात तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला. यात ज्या भागात पाऊस झाले तिथे गारठा वाढला आहे.